शरद पवार विचार मंच तथा सहयाद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे शिवराज्यभिषेक दिन साजरा.

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तथा सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे आज 347 वा राज्यभिषेक दिन स्टुडंट्स केअर इन्स्टिट्यूट इथे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराजांनी रयतेला यथायोग्य सन्मान देऊन नीतिनियमाने राज्यकारभार करून आदर्श पायंडा पाडला. यावेळी शरद पवार विचार मंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, शरद पवार विचार मंच जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरीले, प्रभाग अध्यक्ष मंगेश बोकडे, निलेश बोबडे उपस्थित होते.