ग्रामपंचायत नकोडा येथे शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून “शिवस्वराज्य दिन साजरा” करण्यात आला

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्याबाबत चे निर्देश शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुअनुषंगाने शासन नियामान्वये आज सकाळी ९ वाजता नकोडा ग्रा.प. च्या पटांगणात शिवशक राजदंडाचे प्रतिक म्हणून १५ फुट उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात आला. सर्वत्र शिवरायांच्या जयघोषणा सह स्वराज्यगुढी येथे उभारण्यात आली.
यावेळी उपस्थीत मान्यवर मा. ब्रिजभूषण पाझारे माजी सभापती, समाज कल्याण समिती तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, सरपंच श्री. किरण बांदुरकर, उपसरपंच श्री. मंगेश राजगडकर, रविंद्र चावरे (ग्रामविकास अधिकारी) ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य तनुश्री बांदुरकर, ग्रा. पं. सदस्य रजत तुरणकर, ममता मोरे, माजी सरपंच रूषीजी कोवे, नकोडा भाजप महासंघटक महादेव वाघमारे, अध्यक्ष बाळकृष्ण झाडे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष मधुकर बोबडे, माजी सदस्या कांचन वाकडे, स्वामी गीद्दे, शंकर असम्पेल्ली, विक्की कोवे, व इतर गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून करण्यात आली.