एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरजागड प्रकल्पात आढळलेली नक्षली पत्रके नक्षल्यांनीच टाकली ? अनेक प्रश्नांना फुटले बिंग, वाद चिघळणार सत्य शोधण्याकरिता पोलीस विभागापुढे आवाहन

 

प्रतिनिधी//अंकुश पुरी

गडचिरोली : जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील
सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परिसरात नक्षली पत्रके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल असा मजकुर पत्रकामध्ये नमुद करण्यात आला असून पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सदर पत्रके नक्षल्यांनीच टाकले का की कोणी स्वतःच्या फायदयासाठी नक्षल्यांच्या नावाने पत्रके टाकली असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावर मोठया प्रमाणात लोहखनिजाचे साठे आहेत. या लोहखनिजाचे उत्खनन व वाहतुक करण्याची परवानगी लाॅयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनील मिळाली होती. मात्र नक्षलवाद,स्थानिकांचा विरोध, भौगोलिक परिस्थीती व अडचणींमुळे अनेक वर्षापर्यत हे काम सुरू झाले नव्हते. कामाच्या सुरूवातीपासूनच अनेक समस्या निर्माण झाल्या त्यात नक्षल्यांनी वाहने जाळली, एक अपघात झाला त्यावेळी नागरिकांनी ट्रकची जाळपोळ करून कामाला विरोध दर्शविला तेव्हापासून अनेक दिवस काम बंद होते. त्यावेळी लोहखनिजांचे उत्खनन करण्याकरिता सुरक्षा व्यवस्था सुध्दा प्रदान करण्यात आली होती मात्र अनेक नक्षली घटना घडल्या.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाले असून सदर काम त्रिवेणी अर्थ मुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड, सेलम तामिळनाडू या कंपनीव्दारे सुरू आहे. त्यासाठी मोठया प्रमाणात यंत्रसामुग्री व कामगार तैनात करण्यात आले आहे मात्र संबधित परिसर नक्षलग्रस्त असतांनाही याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नाही. असे असतांना सदर परिसरात नक्षली पत्रके आढळले असून पत्रकात लोहखनिज उत्खननाच्या कामावर जाल तर जिवाशी मुकावे लागेल असा मजकुर पत्रकात आहे. यामुळे पुन्हा वाद चिघळण्याची चित्र दिसत आहे. तसेच सदर पत्रके नक्षल्यांनीच टाकले का असा प्रश्न उपस्थित होत असून नक्षल्यांनीच पत्रके टाकली की कोणी आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी नक्षल्याच्या नावाने पत्रके टाकुण नक्षल्यांच्या नावाने दहशत माजवत आहे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या अगोदर उत्खनानाचे काम मिळालेली कंपनी आणि आता उत्खननाचे काम करीत असलेली कंपनी यांच्यात वाद असल्याने नेमके प्रकरण काय आहे हे चौकशीअंतीच माहिती होणार आहे.
सदर नक्षली पत्रके पोलीस अधिक्षक कार्यालयात जमा करण्यात आले. घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत असून चौकशीअंती अनेक मासे गळाला लागण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

नक्षली पत्रके हे गावाजवळ आढळले असून सदर परिसरात नक्षली असतीलच असे म्हणता येणार नाही, तसेच सदर नक्षली पत्रकावर लिहीलेला मजकुर हा तपासला असता नेमका नक्षल्यांनीच लिहिलेला असावा असेही सांगता येत नाही आहे तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशीअंती दोशींवर कारवाई करण्यात येणार आहे.

सुदर्शन पाटील
उपविभागीय पोलिस अधिकारी, एटापल्ली