विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन संपन्न.

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

संपुर्ण राज्यातील आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा/तुकड्यांना 100%अनुदान देण्यात आले. अश्या शाळांना 15 वर्षापेक्षा जास्त कालखंड होऊनही नियमित वेतन अनुदान मंजूर होत नसल्यामूळे त्यांचे 2 ते 3 महीने वेतन होत नाही. त्यामूळे अश्या शाळेत कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन होत नसल्यामूळे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांचे जीवन विमा हप्ते, गृहकर्ज हप्ते, पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्या जात नसल्यामूळे व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक शिक्षकांना कोवीड-19 ची लागण झाल्यामूळे उपचारार्थ दवाखान्यात भरती व्हावे लागले नियमित वेतन होत नसल्यामूळे त्यांच्या समोर आर्थीक प्रश्न निर्माण झाला आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येते की, आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील (लेखाषिर्श 1901) शाळा/तुकडयांना बिगर आदिवसी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान मंजूर करण्यात यावे व दरमहा 01 तारखेला वेतन अदा करण्यात यावे या मागणीच्या पुर्ततेसाठी कोवीड-19 साथरोगाच्या नियमाचे पालन करून शुक्रवार दिनांक 04/06/2021 ला सर्व शिक्षकांनी कुटूंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह मा. सुधाकर अडबाले यांचे नेतृत्वात संपूर्ण विदर्भात करण्यात आले.
सदर आंदोलनाच्या निमीत्याने लेखाषिर्श 1901 अंतर्गत वेतन घेणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शाळेत/तुकडीवर कार्यरत समस्याग्रस्त मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेर zoom app च्या माध्यमाने ऑनलाइन चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राचे अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले होते. ऑनलाईन चर्चेमध्ये नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्हयातील समस्याग्रस्त मुख्याध्यपक , शिक्षक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला वेतन नियमित होत नसल्यामूळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागते हे विशद केले. कार्यरत शिक्षक आमदार हा मुद्दा सोडविण्यास असमर्थ असल्याचे अनेकांनी विशद केले. त्यामूळे नोव्हें.2022 मध्ये होणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघामधून संघटनेचा उमेदवार निवडून आणू असा अनेकांनी निर्धार व्यक्त केला. संघटनेचे उपाध्यक्ष- अरविंद देशमुख, श्रीधर खेडीकर वर्धा जिल्हयाचे कार्यवाह – महेंद्र सालंकर, अध्यक्ष – सुरेशकुमार बरे, मुख्याध्यापक दिपक बोकडे, अशोक कस्टी, नामदेव ठेंगणे, अनिल कंठीवार, प्रा. अनिल डहाके, ललीता वाघे, संतोश नन्नावार, पुण्यावरून प्रभाकर पारखी, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांनी चर्चेत भाग घेतला चर्चासत्राचे प्रास्ताविक गडचिरोली जिल्हा कार्यवाह- अजय लोंढे तर संचालन चंद्रपूर जिल्हा कार्यवाह- श्रीहरी शेंडे यांनी केले तसेच चर्चेत सहभागी झालेल्या सर्वाचे आभार जिल्हाध्यक्ष- केशवराव ठाकरे यांनी मानले व दुपारी ठिक 4.00 वाजता मा.शिक्षणाधिकारी (माध्य.) मा. उल्हास नरड यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री, अर्थमंत्री, व शिक्षणमंत्री यांना निवदेन पाठविण्यात आले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी महामंडळ सदस्य जगदीश जुनघरी चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष श्री.केशवराव ठाकरे,जिल्हाकार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्षमणराव धोबे, उपाध्यक्ष सुनिल शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिंगाबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, सोनाली दांडेकर, मा.वर्गीय प्रतिनीधी, दिपक धोपटे, सल्लागार, मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, संघटक, सचिन तपासे, मनोज वासाडे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, क.म.वि.प्रमुख, ज्ञानेश्वर सोनकुसरे, प्रसिध्दी प्रमुख, प्रभाकर पारखी, आंनद चलाख यांनी सहकार्य केले.