बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
देशात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी धोखा मात्र तितकाच आहे. सर्वांनी सावधगिरी बाळगणे अति महत्वाचे ठरते आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, मृत्यू दर सुद्धा कमी झालेला आहे . प्रशासनाने तत्काळ लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. 45 वर्षे पुढील नागरिकांना बऱ्याच प्रमाणात लसीकरण पूर्ण झाल्याचे निर्देशनास येत आहे. परंतु देशाच्या मजबूत पाया असणारे युवा वर्गांना अद्यापही कोविडची लस मिळालेली नाही. 45 वर्षापुढील नागरिकांना पहिली व दुसरी लस देने सूरु आहे. परिणामी बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे.
त्याचअर्थी देशातील 18 वर्षे पुढील युवा वर्ग अद्यापही लसीकरणापासून वंचित आहे. मधल्या काळात काही ठिकाणी लसीकरण करण्यात आले. परंतु अल्प प्रमाणात लसीकरण केंद्र व लसीचा साठा कमी असल्यामुळे 18 वर्षे पुढील लसीकरण थांबविण्यात आले होते. कोरोना विषाणूला विरोध करणारे व प्रतिकार शक्ती वाढविण्याकरीत लसीकरण करण्यात येत आहे. परंतु देशाचे भविष्य असणाऱ्या युवापिढीचे लसीकरण होणार की नाही? हा प्रश्न उद्भवत आहे.
प्रशासनाने तत्काळ 18 वर्षे पुढील वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण पूर्ण करण्याकडे कल द्यावा. या करिता जि. प सदस्य ब्रिजभूषन पाझारे यांनी जिल्ह्याधिकारी यांच्या कडे मागणी केलेली आहे.