भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राज्य सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन – ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनातून मागनी

 

प्रतिनिधि//अंकुश पुरी

देसाईगंज : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, यासंदर्भातील राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. परंतु आपण मुख्यमंत्री या नात्याने त्यावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. याचा फटका संपुर्ण ओबीसी समाजाला बसलेला आहे. याबाबत योग्य ती कारवाई करून ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत मिळवून दया अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोली यांच्यावतीने राज्य सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आला यावेळी जिल्हयाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनातून करण्यात आली आहे. सदर आंदोलन संपूर्ण राज्यभरात करण्यात आले आहे.
12 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षण संदर्भाने काही आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने बजावून सांगितले की लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा प्रायोगित तत्वावी माहिती जमा करून तो तात्काळ न्यायालयात सादर करावा. न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र अजूनही आपण साधे राज्य मागासवगीय आयोगाचे गठन देखीन केलेले नाही. हि अत्यंत गंभी बाब आहे. 12 डिसेंबर ला देखील आपल्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारख दिल्या मात्र एकाही तारखेला आपले सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पुर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही देखील या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही. गेल्या पंधरा महिन्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी जवळपास पाच ते सहा वेळा पत्राव्दारे आपल्याला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आला मात्र त्यावरी आपल्याकडून उत्तर आले नाही. तसेच त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
ओेबीसी समाजाला क्षुल्लक एवढेच नाही तर आपल्याकडून सर्वोच्च न्यायालयाचय आदेशाचा वारंवार अवमान केला गेला आहे. याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. गेली पंधार महिने सरकार फक्त कोर्टात जावून पुढची तारीख मागत होते. याबाबत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व आंदोलनात लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सुध्दा निवेदनातून देण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान भाजपा ओबीसी मोर्चा गडचिरोली जिल्हाधक्ष सुनिल पारधी यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डाॅ. होळी, आमदार क्रिष्णाजी गजबे, गडचिरोल न.प.च्या नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, प्रदेश कार्यकारीनी सदस्य बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रमादे पिपरे, प्रदेश सदस्य किसान आघाडीचे रमेश भुरसे, भाजप महामंत्री प्रशांत वाघरे उपस्थित होते.