महाराष्ट्र शासनाने राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यम शाळेतील (कॉन्व्हेंट) कर्मचाऱ्यांना कोरोणा महामारी अनुदान निधी देण्यात यावा- श्री. विवेक आंबेकर

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

राज्यातील खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत (कॉन्व्हेंट )शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बस वाहन चालक कर्मचारी मिळून दहा लाख कर्मचारी कार्यरत आहे. या शाळा विनाअनुदान तत्त्वावर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या फी मधून संस्था कर्मचाऱ्यांचे वेतन करीत असते. परंतु कोरोना महामारी मुळे देशातील तसेच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय ठप्प झाला व अनेक पालकांना आपल्या नोकरी गमवाव्या लागल्या ,अनेकांना वेतन मिळेनासे झाले. त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या फि वर झाला. यामुळे पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांची फी भरली नाही. वरील प्रकारामुळे शाळा संस्थेत आर्थिक संकट आले आहे.

अनेक संस्थाचालक यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व स्कूल बस वाहन चालक कर्मचाऱ्यांचे वेतन करू शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
सर्व कर्मचारी व त्यांचा परिवार या देशातील, या राज्यातील नागरिक आहे. त्यांची उपजीविका चालवण्यासाठी आपले, सरकार म्हणून कर्तव्य आहे. तरी या विनाअनुदानित खाजगी इंग्रजी माध्यम शाळा (कॉन्व्हेंट) च्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस वाहन चालक कर्मचारी च्या वेतनासाठी शाळेला कोरोना आपत्कालीन फंडातून अनुदान मंजूर करावे व त्यांची उपासमार थांबवावी. अशी विनंती माननीय, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ,शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय, वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर मार्फत करण्यात आली आहे व संबंधित
प्रतीलीपी माननीय पालकमंत्री , श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा, माननीय माजी वित्तमंत्री श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार चंद्रपूर, माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार चंद्रपूर, माननीय शिक्षक आमदार नागोजी गाणार ,नागपूर विभाग नागपूर यांना देण्यात आली आहे. अशी माहिती श्री. विवेक आंबेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग प्रमुख, चंद्रपूर व अध्यक्ष, पालक-शिक्षक एकता मंच ,कॉन्व्हेंट स्कूल, चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर (9970381516)
यांनी दिली आहे.