३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार संपन्न

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध (Commit to quit tobacco ) होऊ या आणि आरोग्याशी नाते जोडू या
दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रणासाठी वेगवेगळे विषय घेऊन वर्षभर कार्य केले जाते. यावर्षीचा जागतिक आरोग्य संघटनेचा मुख्य विषय आहे तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध (Commit to quit tobacco). तंबाखूचे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तोटे लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी तंबाखूला रोखण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत असते. यावर्षी देखील आपण सर्वांनी मिळून Commit to quit tbacco या विषयावर अधिक कार्य करावयाचे आहे.
सध्या कोविड १९ या महामारीने सम्पूर्ण जग हादरले आहे. तंबाखू आणि धूम्रपान सेवनाने कोरोना होण्याचा धोका देखील जास्त असण्याचे सिद्द झालेले आहे. ह्या विषयावर सलाम मुंबई फाऊंडेशन मार्फत देखील संपुर्ण भारत देशात कार्य करीत आहे. विशेषत: जे लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांनी तंबाखूचे सेवन करू नये आणि युवकांनी तंबाखू पासून दूर रहावे यासाठी सलाम मुंबई फाऊन्डेशन देखील वचनबद्ध आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून १ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध (Commit to quit ) या विषयावर आधारित सर्वानी ऑनलाइन शपथ घेतली आहे आणि शपथ घेतल्यानंतर शपथ घेणाऱ्याला ऑनलाइन प्रमाणपत्र सुध्दा मिळाले. यासोबतच फेसबुक च्या माध्यमातून तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध (Commit to quit ) या विषयावर फ्रेम मध्ये आपला प्रोफाइल फोटो जोडायचा होता आणि दुसऱ्यांना देखील या अभियानात सहभागी करून घ्यायचे होते.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमावर कार्य करण्याची गरज आणि गांभीर्य लक्षात घेतले तर आपणास लक्षात येईल कि महाराष्ट्र राज्यातल्या प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनाचे प्रमाण हे २६.६ टक्क्यांपर्यंत आहे. भारत देशात तर तंबाखू सेवनांचे प्रमाण हे जवळपास २९ टक्के एवढे आहे. दरदिवशी भारत देशात ३५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मरण पावत आहेत. तर ५५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागावी यासाठी वेगेगळ्या जाहिरातींच्या द्वारे तंबाखू उद्योग समूहाकडून मुलांना तंबाखू सेवना कडे आकर्षित केले जात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊनच सलाम मुंबई फऊंडेशनच्या माध्यमातून २००७ – ०८ मध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरु करण्यात आलेले आहे. सलाम मुंबई फऊंडेशन गत अनेक वर्षापसून तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवित आहे. हे अभियान महाराष्ट्र राज्यासोबतच इतर १० राज्यांमध्ये देखील सुरु झालेले आहे.
सलाम मुंबई फाऊंडेशन आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून, भारत देशातील युवकांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या या कार्याला महाराष्ट्र सरकारचा सक्रीय पाठिंबा लाभला असून सरकारही तंबाखूमुक्त शाळांचे ध्येय १०० टक्के साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजमितीस तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून १० राज्यातील १,५४,१४६ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले असून ५९३ सेवाभावी संस्था देखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण ३४,४०३ शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत. या अभियानातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त व्हावी याहेतूने दरवर्षी, सर्वांच्या सहभागाने ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त देशभर कार्यक्रम करीत असतो.
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, स्वतःला तंबाखूमुक्त ठेवून आपले घर, शाळा आणि परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी आपण सर्वांनी वचनबद्द होणे गरजेचे आहे सर्व समाजाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठीआणि युवा पिढीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिवस २०२१ ची मोहीम आपण आपल्या स्तरावर सलाम मुंबई फाऊंडेशन, शिक्षण विभाग, आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला गेला.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्यासोबतच इतर १० राज्यांमधून २५३०० च्या वर लोकांनी यात सहभाग नोंदविला तसेच फेसबुक फ्रेमच्या माध्यमातून ३२७ पेक्षा जास्त लोकांनी यात सहभाग नोंदविला.
समाजातील सर्व घटकांना तंबाखुच्या दुष्परिणामाविषयी जागृत करून युवा वर्ग आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी ३१ मे रोजी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. त्याठिकाणी तंबाखू नियंत्रणावर भरीव कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे संचालिका मा. डॉ. साधना तायडे मॅडम यांच्या हस्ते विजयत्यांचे नाव घोषित करण्यात आले. यात महाराष्ट्रतील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील राजाराम बापू ज्ञान प्रोबोधिनीचे प्रतिनिधी मा. इलियास पिरजादे, कर्नाटक राज्यातून सहायक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष्य मा. रविद्र कांबळे आणि कोल्हापूर जिल्याचे मास्टर टेनर , महात्मा गांधी व्यसनमूक्ती पुरस्कार विजेते मा. श्रीं एकनाथ चंदर कुंभार होते.
द युनियनचे डेप्युटी रिजनल डायरेक्टर साउथ ईस्ट एशियाचे डॉ. राणा सिंग यांनी सर्व उपस्थितांना तंबाखू विषयी मार्गदर्शन केले.
आपल्या देशातील भावी पिढी तंबाखूमुक्त असणे गरजेचे आहे. यासाठी तंबाखूजन्य पदार्थांना नकार द्यायला हवा. आपले घर, शाळा आणि परिसर तंबाखू मुक्त करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त संकल्प घेवून ऑनलाईन वेबिनारची सांगता करण्यात आली.
यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशनचे श्री. दीपेश ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले, श्री. दीपक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्री. आदेश नांदवीकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.