ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठीआम आदमी पार्टी युवा आघाडी मैदानात

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
आज लाखो OBC विद्यार्थी मित्रांच्या न्याय हक्कासाठी महाज्योती कार्यालय नागपूर येथे बहुजन कल्याण मंत्री व महाज्योती अध्यक्ष मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून व निवेदन देत तातडीने OBC समाजाला न्याय देण्याची व महाज्योती मधील १२५ कोटी रुपये ओबीसी समाजाच्या विकासासाठी ईमानदारीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये व त्यांचे हक्क अधिकार अबाधित राहावेत असे आप युवा आघाडी ने मंत्रांना ठणकावून सांगितले. आप युवा आघाडी नेहमीच विद्यार्थ्यांच्या सोबत राहील व गरज पडल्यास युवकांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन भविष्यात ही करेल अशी चेतावणी आप युवा आघाडी राज्य समिती सदस्या सौ.कृतल पियुष आकरे यांच्या नेतृत्वात देण्यात आली.