अधिग्रहित सेवा सेवापुस्तिकेत नोंद करावी- श्री. सुधाकरराव अडबाले

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

कोव्हिड 19 आजार नियंत्रणासाठी ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या उन्हाळ्याच्या सूटट्यामधे सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. अशा कर्मचार्यांना बदली रजा मंजूर करून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याबाबत निवेदन श्री. सुधाकरराव अडबाले, सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शि क्षक संघ यांनी मान. आयुक्त शिक्षण,आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांना विमाशी जावक क्रमांक: 25/2021 दिनांक: 25/05/2021 रोजी दिले आहे.