मार्च, एप्रील 2021 चे वेतन लवकर होणार- श्री. नरेंद्रजी बोबडे

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आज मा. बोदाडकर साहेब अधिक्षक, वेतन पथक चंद्रपूर यांची भेट घेऊन ज्या शाळांचे मार्च, एप्रिल महिन्याचे वेतन झाले नाही याबाबत माहिती घेण्यात आली ।संबंधित शाळांचे वेतन देयक ट्रेझरी मध्ये सादर केले आहेत, आज किंवा उद्या ट्रेझरी मधून आले की लगेच बँकेला पाठविले जाईल, तसेच मे महिन्याचा निधी शासनाकडून अजून पर्यंत अप्राप्त आहेत, त्यामुळे मे महिन्याचे वेतन उशिराने होईल असे वेतन अधिक्षक श्री. बोदाडकर साहेब यांनी चर्चेप्रसंगी सांगितले.
अशी माहिती श्री. नरेंद्र एल .बोबडे जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर
जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन यांनी दिली आहे.