28 मे रोजी गणेशपेठ येथे वैदर्भीय लोहार समाजाची विशेष सभा

 

महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोल्ली:- वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपुर(विदर्भ) वतीने नागपुर येथील श्रीगुरुदेव सेवाश्रम रमण विज्ञान गार्डन जवळ गणेशपेठ नागपुर येथे महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य चरणदास बावणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केलेले आहेत.
लोहार, खाती, गाडीलोहार,खातवाडी समाजाच्या उन्नतीसाठी राज्यस्तरीय अधिवेशन २४ व २५ डिसेंबर २०२३ रोजी घेण्याचे ठरविले असून अधिवेशनाबाबत चर्चा करून मंत्री महोदयांना निमंत्रण व उपस्थित राहण्याचे चर्चा करण्यात येईल व मागील सभेचे वृत्तांत वाचन करणे,जमा खर्चास मंजुरी प्रदान करणे,समाजाच्या अधिवेशन व वधू-वर परिचय मेळावा घेण्याचे नियोजन,अधिवेशन नियोजन समिती निवड,सभागृह ठरविणे,येणाऱ्या समाज बांधवांची अंदाजित संख्या निश्चित करणे,भोजन व्यवस्था, गाड्या पार्किंग करणे,प्रसिद्ध पत्रिका छापणे व वेळेवर अध्यक्षच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा करणे असे समाजातील विविध विषयांवर चर्चा घडवून सामाजिक अधिवेशन व उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सभा आयोजित केले आहे तरी महाराष्ट्र राज्यातील समस्त महासंघाचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, गावशाखा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व समाज बांधव जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विशेष सभा पार पाडतील अशी आवाहन वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघाचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावणे सचिव सुरेश मांडवगडे, युवाध्यक्ष जितेश मेश्राम यांनी केले आहेत.