स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर विक्रमगड येथे संपन्न.

 

“सरकार आपल्या दारी” अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन महिला व बालक विकास विभाग कडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन विक्रमगड येथे करण्यात आले होते.
पंचायत समिती कार्यालय विक्रमगड येथील सभागृहात संपन्न झालेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप पावडे सभापती पशुसंवर्धन व कृषी जिल्हा परिषद पालघर, यशवंत कनोजा सभापती पंचायत समिती विक्रमगड, श्री .लहांगे सदस्य पंचायत समिती विक्रमगड, प्रदीप गीते प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रमगड पोलीस स्टेशन ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. पाटील, महावितरण चे नागुलकर, विक्रमगड नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साबळे, मंडळ कृषी अधिकारी सुनील पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शिनगारे यांनी केले .आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शासनाच्या विविध योजनां बद्दल माहिती सांगून महिलांना शासकीय कामात भेडसावणाऱ्या समस्या सांगण्याचे आवाहन केले व समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना बद्दल माहिती सांगितली. तहसीलदार चारुशीला पवार यांनी आपल्या भाषणात शासन राबवित असलेल्या सरकार आपल्या दारी अभियानाबद्दल उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. सभापती यशवंत गणोजा यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. विक्रमगड नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साबळे यांनी नगरपंचायत मार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ब्युटी पार्लर व शिवणकाम वर्गा बद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक अनिल पटारे सर यांनी केले. या शिबिरास तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.