#khabardarmaharashtr#onlinenewsportal#sports#education#political#crime
अहेरी : मद्यापाश एक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने या आजाराला आजारांच्या यादीत टाकण्यात आले आहे. या विषयावर अल्कोहोलिक अनानिमस 1935 पासून काम करीत आहे. अहेरी,आलापल्ली व एटापल्ली येथे या संघटने चे समूह असून या संघटनेच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा चे आयोजन मॉडेल स्कूल अहेरी येथे दिनांक २७ व २८ मे २०२३ ला आयोजित करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून या आजाराला बळी पडलेल्यां नी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
१९३५ ला दोन मद्यपिंच्या आत्मकथनतून या संघटनेची सुरुवात झाली. जगात १८८ देशात ही संघटना कार्यरत आहे. आत्मकथन हा संघटनेचा आत्मा आहे. जुना मद्यपी आपले अनुभव कथन करतो. यात हतबलता, अस्तव्यस्तता सांगतो. नवीन सदस्य ऐकतो. यातून त्याच्यात आशा निर्माण होते. ती प्रामाणिक प्रयत्न करतो. जुने सभासद त्याला वेळोवेळी सहकार्य करतात. या पद्धतीने जगात लाखो मद्यपी मद्या पासून दूर झाले आहे. अहेरी, आलापल्ली येथे 50 च्या वर मद्य मुक्त सभासद आहेत. सुखी आणि समाधानी जीवन जगत आहेत.
आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र येथील सभासद सहभागी होत आहेत.