त्या कॅन्सरग्रस्त व्यक्तीला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून उपचारास आर्थिक मदत

 

विशेष प्रतिनिधी//विजय कुसनाके

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#political#education#crime

अहेरी: तालुक्यातील शिवणीपाठ येथील सुरेश वेलादी यांना कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे. म्हणून आज सुरेश वेलादी यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपचारासाठी आर्थिक मदत केले.
*या वेळी सुरेश वेलादी,सुमित्रा सुरेश वेलादी,सुंदराबाई मडावी,प्रशांत वेलादी,दशरथ तलांडे,आविस सल्लागार विशाल रापेल्लीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,सुधाकर कोरेत,महेश सडमेक, उपस्थित होते.