तोळगट्टा येथील आंदोलनाला जाहीर समर्थन देऊन मदत करा;ऍड लालसु नोगोटी

 

 

#khabardarmaharashtra#onlinnewsportal#social#political#education#crime

दमकोंडावाही बचाओ संघर्ष समिती व सुरजागड पट्टी पारंपपारीक गोटूल समिती तर्फे मौजा तोड़गट्टा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडलचिरोली येथे बेमुद्दत ठीय्या आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलन 11 मार्च पासून सुरु करण्यात आले असून आंदोलन सुरु होऊन आज 70 दिवस झाले आहेत. या आन्दोलनाला भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समिती, वेन्हारा पट्टी पारंपारिक गोटूल समिती, तोड़सा पट्टी पारंपारीक गोटूल समिती व रोपी बरसा इत्यादी इलाकयांनी समर्थन दिले आहे. तसेच छत्तीसगढ़मधील मूलनिवासी बचाओ मंचने सुद्धा समर्थन दिले आहे. आजपर्यंत या आन्दोलनाला एकही राजकीय पक्षाने समर्थन दिले नसून देशातील व राज्यातील राजकीय पक्ष येथील जल, जंगल, जमीन व नैसर्गिक संसाधन लूटून घेऊन जाणाऱ्या खदान कंपनीच्या पक्षात असल्याचे दिसत आहे. या देशातील आदिवासींची अस्तित्व, अस्मिता व आत्मसन्मान धोक्यात आली आहे. तसेच आदिवासी व इतर पारंपारिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा, 2006, पेसा कायदा, 1996, जैवविविधता कायदा, 2004, भारतीय संविधानातील पांचवी अनुसूसूची व ख़ुद भारतीय संविधानाचे उलंघन होत आहे. भारतीय वन संरक्षण अधिनियमात बदल करून दलाल, पूंजीपती, भंडवालशाही यांना येथील नैसर्गिक खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी सोयीस्कर मार्ग तयार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत येथील स्थानिक आदिवासी व अन्य परंपरागत वन निवासी एक हाती संविधानिक लढ़ा देत आहेत. लोक आपापल्या गावातून-घरातून शीधा पाणी घेऊन आंदोलन स्थली येत आहेत. प्रत्येक गावासाठी एक चूल मांडून स्वयंपाक करत आहेत. आंदोलन स्थली दिवसातून दोन वेळा बैठक होत आहे. या आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्याने उपस्थित आहेत. आदिवासी युवा विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थीसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले जात आहे. काही गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील आंदोलनकर्त्यांना राहण्यासाठी ताड़पट्टीच्या झोपडया बनविले आहेत. या ताड़पट्टीच्या झोपडयाचा वापर ते कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी करतात. नंतर पुढे पावसाळ्यात आंदोलन सुरु राहिल्यास याच झोपड्यात आंदोलनकर्ते राहणार आहेत. तोड़गट्टा येथे सुरु असलेल्या आन्दोलनातील कार्यकर्त्याच्या वतीने आंदोलनात सहभागी व्हावे व आन्दोलनाला जाहीर समर्थन देऊन मदत करण्याचे जाहीर आवाहन ऍड लालसु नोगोटी यांनी केली आहे