शाळकरी मुलाजवळून जबरीने मोबाईल व पैसे हिसकावनारे आरोपींना सेवाग्राम पोलीसांनी नागपूर येथुन केले अटक

 

प्रतिनिधि//उमंग शुक्ला
वर्धा :फिर्यादी नामे सुरज सुरेश नगराळे वय 17 वर्ष, रा कुटकी तळोदी यांनी हा दि. 25/05/2022 रोजी सकाळी 06.00 ते 6.30 वा दरम्याण ट्युशन क्लास करिता जाण्यासाठी कुटकी फाट्यावर थांबुन असता सेवाग्राम कडुन एका पांढरे रंगाचे मोपेड गाडीवर तिन ईसम आले व फिर्यादीस नागपूर कडे जाण्याचा रस्ता विचारला व फिर्यादीस चाकु दाखलुन चाकुचे धाकावर फिर्यादी जवळ असलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल 1000/- व मोबाईल कव्हर मध्ये असलेले नगदी 500 रु असा एकुन 1500/- रु चा माल हिसकावुन नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टेला दिनांक – 25/05/2022 रोजी अप.क्र. 291/22 कलम 392,34 भादवी चा गुन्हा नोंद झाला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहिती प्रमाने आरोपी नामे 1)अंशुल विजय ढाले वय 22 वर्ष, रा.जाटतरोडी चौकी मागे ईमामवाडा नागपूर 2) प्रतिक दिपक चारभे वय 20 वर्ष, रा. एकात्मता नगर गल्ली न. 4 जयताळा नागपूर यास नागपूर येथुन अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरलेले नगदी 500 रु रिअलमी कंपनीचा मोबाईल कि. 1000/- रुचा तसेच गुनह्यात वापरलेली पांढऱे रंगाची मोपेड. क्र. MH 31-EX- 7851 किमंत 40,000/- रु चा माल जप्त करुन गंभीर गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे स.फौ संजय लोहकरे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, पोशि पवन झाडे, अभय ईगळे, नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी तसेच सायबर सेल चे निलेश कट्टोजवार यांनी केली.