31 मे रोजी होणारी प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा स्थगित  9 जून रोजी स्पर्धेचे आयोजन

 

चंद्रपूर : आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्याकरीता आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे 31 मे रोजी होणारी नृत्य स्पर्धा स्थगित करून नव्याने दि. 9 जुन 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपुर येथे होणार आहे. आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेला आदिवासी बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहून या नृत्य स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.