दक्षिण एक्स्प्रेसचे हिंगणघाट रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत खासदार रामदासजी तडस व आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नाला यश

प्रतिनधि // उमंग शुक्ला

कोरोना काळात तब्बल 2 वर्षापासून बंद असलेली दक्षिण एक्स्प्रेस खासदार रामदासजी तडस व आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने रविवार दिनांक 29 रोजी पासून हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. सकाळी 7 वाजता हैद्राबाद निझ्झामुद्दिन दक्षिण एक्स्प्रेस चे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून मा. खासदार रामदासजी तडस , मा.आमदार समीरभाऊ कुणावार, भाजपा महामंत्री किशोरभाऊ दिघे,माजी आमदार राजुभाऊ तिंमाडे,माजी नगराध्यक्ष प्रेमाबाबू बंसतानी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीरबाबू कोठारी,किरण वैद्य, राजेंद्रजी डागा, सुभाष कुंटेवार सहित सर्व पक्षीय नेते समाजसेवक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांचे हस्ते लोको पायलटचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी खासदार रामदासजी तडस व आमदार समीरभाऊ कुणावार यांनी हिंगणघाट ते सिंदी रेल्वे असा प्रवास केला.