शिवसैनीक व पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त पाळुन शिवसेना वाढीकरीता प्रयत्न करावे शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाऊ राऊत

आर्वी :शिवसेने मध्ये पक्ष शिस्तीला जास्त महत्व दिल्या जाते याचे भान ठेवुन पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त पाळुन शिवसेना वाढीकरीता जोरदार प्रयत्न करावे. याचा लाभ येत्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत चांगले यश प्राप्त करण्याकरीता होईल असे नवनियुक्त वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाऊ राऊत यांनी येथे प्रतिपादन केले स्थानीक आयनक्स सिलेब्रेशन हॉल मध्ये शिवसेना संपर्क अभियांनाअतंर्गत आढाव बैठक घेण्यात आली या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते या बैठकीचे अध्यक्ष शिवसेनेचे वर्धा जिल्हा प्रमुख (आर्वी-देवळी,पुलगाव) बाळाभाऊ उर्फ प्रशांत शहागडकर हे होते तर, वर्धा जिल्हा प्रमुख (हिंगणघाट-वर्धा) अनिल देवतारे, उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, देवळी विधानसभा संपर्क प्रमुख रमेश कांबळी, आर्वी विधानसभा संपर्क प्रमुख प्रफुल भोसले, वर्धा विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे, हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश कांबळे, ठाणे विभाग प्रमुख विजय चव्हाण, ठाणे शहर प्रमुख पवार, वर्धा जिल्हा माजी महिला संघटीका सौ. सवीताताई पुरी, कारंजा तालुका प्रमुख संदिप टिपले, आर्वी तालुका प्रमुख गुड्डु गावंडे, आष्टीचे उपतालुका प्रमुख सुरेश टरके हे प्रमुख अतिथी होते.
पुढे ते म्हणाले, शिवसेनेचे विचार समाजातील शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहचवीण्याकरीता आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कर्मविर आनंद दिघे यांच्या पासुन प्रेरणाघेवुन काम करीत आहो. पक्षशिस्त आमच्याकरीता महत्वाची आहे याचे भान ठेवुन शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनीकांनी गावावात शाखा वाढवीण्याकरीता व शिवसेनेचे विचार व कार्यक्रम शेवटल्या माणसा प्रयत्न पोहचविण्याचे प्रयत्न करावे असे आव्हान केले.
या प्रसंगी बाळाभाऊ शहागडकर, प्रफुल भोसले यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
दशरथ जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडतांना, आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगर परिषद व नगर पंचायतीची माहिती आकडेवारीसह मांडली.
कार्यक्रमाचे संचालन आर्वी शहर प्रमुख दिपक लोखंडे यांनी केले. आभार मनीष अरसड यांनी मानले.
या बैठकीला कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील शिवसेना व महिला संघटनेचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आदि पदाधिकाऱ्यांसह शिवसैनीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता, सर्व्हेश देशपांडे, महेश देवशोध, विकास परणकर, विनोद डोंगरे, शरद वरकड, अजय अवथनकर, धिरज लाडके, कैलाश इखार, नितीन राहण, नरेश वडणारे, प्रकाश खांडेकर, भरत चव्हाण, संकेत राठोड आदिंनी परिश्रम घेतले. अभय ढोले, अक्षय देशमुख, महेश कुंभारे, शंकर पांडे, अन्ना बावरी, श्याम, प्रशांत भांगे, घागरे, रमेश डोंगरे, टेकशनराव बारंगे, दिनेश मलवे, हेमंत मुने तथा शिवसैनीक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.