उमंग शुक्ला / प्रतिनिधि
जागतिक स्थरावर कच्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत हे सर्वजण जाणतात पण असे असतांना सुद्धा देशातूल जनतेला महागाई पासुन दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पट्रोलवर ८ रूपये आणि डिझेलवर ६ रूपये जनतेकरीता कर कमी केलेला आहे. यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. पण केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रामक पाऊल उचलले. आजच्या घटकेले केंद्र सरकारचा कर हा १९ रुपये आकारते आहे व ३० रू कर हा राज्य सरकार आकारते आहे. महाराष्ट्र राज्य संपुर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे. संपुर्ण देशातील इतर राज्य १७-१८ रूपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीने ऐव्हड्या मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला कर हा जनतेवर होणारा घोर अन्याय आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा कारंजा शहर तर्फ आज भाजयुमो चे वर्धा जिल्हा महामंत्री तथा हिंगणघाट विधानसभा प्रभारी आवेज दादा खान यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजयुमो कारंजा(घाड़गे) शहर अध्यक्ष वेदज्ञ घिमे यांच्या नेतृत्वात
कारंजा चे तहसीलदार यांना निवेदन देन्यात आले या निवेदना द्वारे राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. जर का हे पाऊल येणार्या ३ दिवसांमध्ये म्हणजेच ७२ तासांमध्ये उचलले नाही तर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आक्रामक आंदोलन करण्यात येईल आणि मग ज्या गोष्टी घडतील त्याला संपुर्णपणे महाविकास आघाडी जवाबदार असेल. तेव्हा तत्काळ यावर कारवाही करावी ही विनंती या वेली करण्यात आली. या वेली भाजयुमो वर्धा जिल्हा महामंत्री आवेज खान,भाजयुमो कारंजा शहर अध्यक्ष वेदज्ञ घिमे,राजेश घाड़गे,आशुतोष घिमे,सुदर्शन राऊत,गणेश चाफले,श्रीरंग बैगने,नितिन काशिकर,ऋतिक भांगे,धीरज काशीकर,गौरव गावंडे,सूरज सरोदे,नौकेश किनकर,प्रज्वल खोपे,चेतन भांगे,राहुल चाफले,मयूर कावड़कर,प्रतीक चाफले,ऋतिक नासरे,इत्यादि भाजयुमो चे कार्यकर्ते उपस्थित होते.