स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व सायबर शाखेचा लाईव्ह IPL क्रिकेट मॅच जुगारवर छापा एकूण २६,३३,९००/- चा मुद्देमाल जप्त.

 

वर्धा: दिनांक ०३-०४-२०२२ रोजी मुखबिरचे खात्रीशीर माहितीवरून होमेश्वर वसंतराव ठमेकर, वय ५० वर्ष, रामनगर, वर्धा च्या मालकीचे सावंगी मेघे येथील फॉर्म हाऊसवर कायदेशीररीत्या प्रवेश करून आयपीएल ऑनलाईन क्रिकेट सट्टा-जुगारवर छापा टाकला असता आरोपी क्रमांक १) होमेश्वर वसंतराव ठमेकर, वय ५० वर्ष, रा. रामनगर, वर्धा, २) प्रवेश पुंडलिकराव चिनेवार, वय ४२ वर्ष, रा. नाचणगाव, पुलगाव, ३) अशोक भगवंत ढोबळे, वय ३२ वर्ष, रा. पुलगाव, ४) गिरीश नामदेवराव क्षिरसागर, वय ३१ वर्ष, रा. रामनगर जि. चंद्रपूर, ५) दिनेश प्रताप नागदेव, वय २९ वर्ष, रा. दयालनगर, वर्धा, ६) अविन प्रदीप गेडाम, वय ३० वर्ष, रा. पुलगाव जि. वर्धा हे दिनांक ०३-०५-२०२२ रोजी डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या संघाच्या आयपीएल २०-२० ओव्हरचे मॅचवर टीव्ही स्क्रीन वरील लाईव्ह क्रिकेट मॅचवर २ होल्ड बॉक्समध्ये मोबाईल जोडून असलेल्या वेगवेगळ्या मोबाईलवर ग्राहकांशी संपर्क साधून त्यांचे आलेले कॉल आळीपाळीने स्वीकारून गुजरात टायटन या संघावर त्यांचे जवळील सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल मधून CREX cricket Ex. या ॲपद्वारे लाईव्ह मॅच स्कोर बघून व मॅचवर पैशाची पैज लावून स्वतःचे फायदे करिता हार-जीतचा जुगार खेळत असतांना मौक्यावर रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचे पासून १) क्रिकेट सट्टा जुगाराचे नगदी ३,५००/- २) तीन टीव्ही संच, ३) दहा नग अँड्रॉइड मोबाईल संच, ४) ३६ साधे किपॅड मोबाईल संच, ५) ३ रेकॉर्डर संच, ६) एक वायफाय डोंगल, ७) दोन लॅपटॉप, ८) १ इन्वर्टर, एक बॅटरी व एक हिशोबाची डायरी, ९) १ चारचाकी वाहन, १०) तीन दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकुण जु.की. २६,३३,९००/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून इतर जिल्ह्याचे बुकीशी तार जूळले असण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनि. अमोल लगड, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, निरंजन वरभे, हमीद शेख, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, रणजीत काकडे, दीपक जाधव, गजानन दरणे, अखिल इंगळे, यशवंत गोल्हर, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, राजेश जयसिंगपुरे, रितेश शर्मा, अभिजीत वाघमारे, तसेच सायबर शाखेतील निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जीभे यांनी केली.