माजी आमदार अमर काळे यांच्या मध्यस्तीने उपोषणाची सांगता रोड व नाल्यांची मागणी अखेर मंजूर

 

वर्धा गेल्या 25 ते 30 वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक एल. आय. जी.कॉलनी व कन्नमवार नगर येथील रोड व नाल्याच्या मागण्यांसाठी आर्वी तील छत्रपती शिवाजी चौक येथे स्थानिक रहिवाशांनी 1 मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण सुरू केले होते दिनांक 2 च्या रात्री 9 वाजता माजी आमदार अमर काळे यांच्या उपोषण कार्यकर्तच्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर या वॉर्डातील युवकांनी उपोषण मागे घेतले उपोषण कार्यकर्त माजी आमदार अमर काळे यांनी भेट घेऊन समस्येबाबत अर्धा तास चर्चा केली यात एल. आय. जी. कॉलनी येथील पंकज सुकळकर ते बावणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली बांधकाम ,कॉलनीतील उर्वरित रोड वर पावसाळ्या पूर्वी मुरूम टाकून रस्ता चालण्या योग्य करणे ,कन्नमवार नगर येथील घारड सर ते स्वामी समर्थ मंदिर रोड चे सिमेंट बांधकाम व नाल्या व कॉलनीतील रस्त्यावर पावसाळ्या पूर्वी मुरूम टाकून रस्ता योग्य करणे आदि मागण्यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषणाला बसलेले एल. आय. जी .कॉलनीतील कमलेश गुल्हाने,प्रतीक भिमटे,कन्नमवार नगर येथील अनिकेत अडणेकर यांनी उपोषण मागे घेतले यावेळी या उपोषणाला या दोन्ही वार्डातील तुषार नंदनवार,कौशिक गोंधळी,पंकज सुकळकर ,अमित सोंनपराते ,अखिल पुरोहित,सूरज भुयार ,मनीष भोयरकर,सचिन तिरभाने, ,लता भस्मे,किरण शेंद्रे ,शोभा देशमुख ,राधा खांडेकर,उज्वला सोनपराते,नलिनी तीरभाने,सुलोचना पखाले , छाया अडनेकर,वंदना सहारे आदि स्थानिक रहिवाशांनी उपोषणाला पाठिंबा दिला व रहिवासी उपस्थित होते