महिला आघाडीकडून महिला सक्षमीकरण अभियानाला सुरुवात..

प्रतिनिधी //धीरज कसारे: खबरदार महाराष्ट्र 

कारंजा: श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात एक “तरी अंगी असुदे कला नाही तर काय फुका जन्मला” तुमच्या अंगात जर एकही कला नाही तर तुमचा जन्म व्यर्थ आहे असे महाराज म्हणतात आणि खरोखरच एखादी कला जर तुम्हाला अवगत आहे तर तुम्हाला ती कला उपाशी मरू देत नाही हे मात्र नक्की

 

म्हणूनच महाराजांच्या या विचारांना धरून भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.ज्योती गंगाधरराव यावले आणि महिला आघाडीच्या चिटणीस सौ प्रिया श्याम काळे यांनी घराघरातील महिला सक्षम व्हावी म्हणून शिवणकला व पार्लर याचे प्रशिक्षण जीआज काळाची गरज आहे . त्याचे उद्घाटन आर्वी विधानसभेचे श्री दादारावजी केचे यांच्या हस्ते श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजा येथे करण्यात आले उद्घाटनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाला उपस्थित शिरीष भांगे.. किशोर भांगे ..दिलीप जसुतकर

 

संजू भाऊ कदम प्रमोद भाऊ चव्हाण हेमराज भाऊ भांगे अजय भाऊ कावडकर गजानन भाऊ सरोदे योगिता कदम उषा चव्हाण ढबाले ताई रमाताई दुर्गे वैशाली सरोदे सुवर्ण कावडकर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन सुवर्णाताई कावडकर यांनी तर प्रास्ताविक ज्योती यावले आभार प्रदर्शन वैशालीताई सरोदे यांनी केले