काजळी येथे ग्रामजयंती ऊत्सवा निमित्त युवक मेळावा

प्रतिनिधी //धीरज कसारे : खबरदार महाराष्ट्र

 

वर्धा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती ऊत्सव श्री हनुमान देवस्थान सिर्मी कोंढाळी येथे वेगळ्या पद्धतीने व युवा शक्तीला योग्य दिशा दर्शक, समाजाची दशा कशी बदलता येईल या दृष्टीने पुरक असे ग्रामगीता तत्वज्ञान, वं राष्ट्रसंतांचे जीवनदर्शन, अध्यात्म तसेच व्यक्तीमत्त्व विकास ईत्यादि महत्वपूर्ण विषयावर चिंतन मंथन झाले यावेळी अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज कार्यकारिणी सदस्य श्री बाबारावजी पाटील, नागपुर जिल्हा प्रचार प्रमुख श्री नीलकंठजी कळंबे, राष्ट्रीय युवक संघठन अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय सदस्य श्री हरिश्चंद्र देशमुख, मानवतावादी सत्याग्रही पक्षाचे संस्थापक श्री. जयवंतजी वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी काजळी येथील युवा रोशन वरठी, हरिश वळवटकर तुषार वळवटकर गौरव वळवटकर रवी चौधरी देवानदं बोरजे ओमकार चोपडे राजु ढोलेव त्यांचे काजळी व जोगा येथील युवा सहकारी यांच्या माध्यमातून हा योग घडुन आला. वं राष्ट्रसंताची आरती व जय घोष व महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला प्रास्ताविक हरिश्चंद्र देशमुख व आभार प्रदर्शन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा प्रमुख रोशन वरठी यांनी केले.