मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

 

 

ठाणे: महाराष्ट्र दिनाच्या मंगल दिनी ठाणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाऊन हॉल आणि अँफी थिएटर च्या नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

टाऊन हॉलची ही इमारत शहराच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्वाची वास्तू असून ती १९१७ साली बांधली गेली होती. त्यानंतर १९२८ साली नागरिकांना वापरण्यासाठी हा हॉल ठाणे गव्हर्नरला सुपूर्द करण्यात आला. १९९६ साली या हॉलचे नुतनीकरण करून त्यासमोरील मोकळ्या जागेत अँफी थिएटर बांधण्यात आले. आता या टाऊन हॉलचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले असून तो वातानुकूलित करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या बांधणीसाठी खास नेवासा येथून दगड मागविण्यात आले आहेत. अँफी थिएटरवर कव्हर टाकण्यात आल्याने आता पावसाळ्यात आणि दुपारच्या वेळेत देखील येथे कार्यक्रम घेता येणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे आता या टाऊन हॉलच्या डागडुजी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेला देण्यात आली आहे. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा हॉल वापरता येणे शक्य होणार आहे..

याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी भाऊसाहेब दांगडे आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित होते.