मुख्याधिकारी डॉ सागर घोलप यांच्या पुढाकाराने (स्वच्छता मित्र) नंदकिशोर गोंडले यांना ध्वजारोहणाचा मान

 

आर्वी:आज दिनांक 1 मे रोजी आर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सागर घोलप यांचे पुढाकाराने ध्वजारोहन करण्याचा बहुमान स्वच्छता कर्मचारी (स्वच्छता मित्र) नंदकिशोर पापा गोंडले यांना देण्यात आला सदर कार्यक्रमासाठी माननीय उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक माननीय मुख्याधिकारी डॉक्टर सागर घोलप तसेच नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.रणजित पवार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय जी अंभोरे कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग श्री प्रमोद निकाजू कनिष्ठ अभियंता श्री साकेत राऊत स्वच्छता निरीक्षक श्री सुनील आरीकर तसेच नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी,कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी (स्वच्छता मित्र) व शिक्षक वर्ग उपस्थित होते 1 मे 62 वा वर्धापन दिन औचित्य साधून महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्ताने नगरपरिषदेच्या आवारामध्ये self watering plant (रक्षक रोपे) तसेच गांधी विद्यालय व शिवाजी शाळा परिसरात देखील वड, पिंपळ ,कडुलिंब ,जांभूळ इत्यादी देशी रोपांची असे एकूण 62 रोपांची लागवड करण्यात आली तसेच ध्वजारोहण कार्यक्रमावेळी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची उपस्थित नागरिक व कर्मचारी यांना माहिती देण्यात आली.