कारंजा तालुक्यात प्रहार च्या युवकांचा राष्ट्रवादीत भव्य पक्ष प्रवेश

 

तालुका प्रतिनिधी //धीरज कसारे

कारंजा:- कारंजा तालुक्यातील प्रहार संघटनेतील युवकांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतलेला आहे कारंजा तालुक्यातील आंदोलन करण्यात प्रसिद्ध असलेल्या प्रहार संघटनेतील अक्षय भोने ,रोहित घागरे यांच्या सह प्रहार च्या कार्यकत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन किनकर यांच्या नेतृत्वाखाली हाताला घड्याळ बांधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो युवकांचा प्रवेश आज कारंजा येथील विश्राम गृह येथे घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमला कारंजा तालुक्यातील प्रहार व भाजपाचे पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कप्रमुख सुबोध मोहिते यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. आज दिनांक 30 एप्रिल ला कारंजा येथील विश्रामगृहात कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथील प्रहार चे अक्षय भोणे सोबतच प्रहार अपंगक्रांती चे शंकरराव गाडगे यांनी युवकांसह सुबोध मोहिते यांच्या हस्ते राष्ट्रवादीची घड्याळ हाताला बांधली, तसेच कारंजा तालुक्यातील सेलगाव (लवणे ) येथील भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ देशभ्रतार, समीर बागडे, यांनीसुद्धा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास देत राष्ट्रवादीची घड्याळ हाताला बांधली. त्यांच्यासह इतर सहकारी सुद्धा राष्ट्रवादीत सामील झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आर्वी विधानसभा प्रमुख गोपाल मरस्कोल्हे,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, आर्वी विधानसभा सचिव अनंत झाडे,आष्टी तालुकाध्यक्ष अताउल्ला खान कारंजा महिला तालुका अध्यक्ष पुष्पा गोहते, कारंजा तालुका अध्यक्ष प्रशांत घोरमाडे, विधानसभा संघटक अनिस मुल्ला, कारंजा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन किनकर, यांचेसह असंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रोहित घागरे, बंटी दिग्रसे, सागर चोपडे, अभिषेक मारोडकर, शुभम पाठमासे, तुषार ढोले, विलास, पंकज चौधरी, बादल ढोबळे, अंकुश पेंधे, साहिल इखार, सागर आष्टणकर, यश डोंगरे, स्वप्नील ढोबळे, सुमित चोपडे, उमेश ढोले, गौरव गोरे, गौरव चोपडे, रोशन कालभूत, लोकेश ढोबाळे, अभय नासरे, प्रीतम पंचाल, शेखर ढोबळे, अक्षय डोंगरे, सागर आटनेकर , तेजराम भोने, महेश चौधरी यांनी प्रवेश घेतला.
येत्या जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत संभाव्य जबाबदारीची जाणीव देत पक्ष संघटना सक्रीय करण्याचे सुतोवाच संपर्क नेते सुबोध मोहिते पाटील यांनी केले.