आर्वी न प मुख्याधिकारीपदी डॉ सागर घोलप

 

आर्वी: येथे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त पदी असलेले डॉक्टर सागर घोलप यांची आर्वी नगर परिषद मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली नियुक्त झाल्यानंतर त्यांनी आर्वी न. प मुख्याधिकारी पदाचा दिनांक 29 एप्रिलला पदभार स्वीकारला यावेळी नजीर खान, अँड दिलीप ठाकरे, सुरेंद्र डाफ, राजु डोंगरे, उमंग शुक्ला , तौसिफ राजा, लखन दाभने, आदी पत्रकार मंडळी, आर्वीतील सामाजिक कार्यकर्त व न. प चे अधिकारी वर्ग व कर्मचारी यांची उपस्थित होती गेल्या सहा महिन्यांपासून आर्वी न. प मुख्याधिकारी हे पद प्रभारी पदावर होते.आता डॉक्टर सागर घोलप हे पुर्ण वेळे पदी नियुक्ती झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.