केंद्रात मा.नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्वातील सरकारला सफलता पुर्वक 7 वर्ष झाल्या निमित्याने बल्लारपूर भाजपा व महीला आघाडी च्या वतीने कोरोना योद्धांचा,आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे स्यानीटायझर मशीन चे लोकार्पण

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

केंद्र सरकार ला मा.मोदीजी यांच्या अतुलनीय नेतृत्वात ७ वर्ष पूर्ण झाले असुन बल्लारपूर भाजपा च्या वतीने महाराष्ट्राचे लोकनेते विकासपुरुष माजी वित्त मंत्री मा.आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकलेखा समिती महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्या आवाहनावर भाजपा ज्येष्ठ नेता मा. श्री. चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात मा.श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष न. प. बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर भाजपा अध्यक्ष श्री काशिनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत आज दि. ३१/५/२०२१ रोज सोमवार ला शहरात ज्यांची कोरोनामुळे मृत्यु झाली अश्या मृत देहाचा अंतिम संस्कार करणारे युवा कर्तुत्वान, माणुसकी चे जिवंत उदाहरण जपणारे कोरोना योद्धा यांचा तसेच आशा वर्कर म्हणून आपले कर्तव्य बजावणारे महिलांचा महिला आघाडी भाजपा तर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन सन्मान करुण सुरक्षा किट व धान्य किट वितरण करण्यात आले.खरतर त्यांच्या या सेवेला आपण कोणत्याही दृष्टीने आखु शकत नाही पण एकप्रकारे त्यांचा आभार व्यक्त करून त्यांच्या हितासाठी आम्ही सदैव सोबत असून प्रत्येक परिस्थितीत उभे राहु असा सूचक संदेश मा. नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा द्वारा या मोदी सरकारच्या ७ वर्षपूर्तीवर व्यक्त करण्यात आला. सोबतच यावेळी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे नवीन स्याॅनिटायझर मशीन चे लोकार्पण करण्यात आले.भाजपा हि सदैव जनसेवा व जनहितासाठी राजकारणात असुन देशाच्या आखरी व्यक्ती पर्यंत विकासाची धारा नेण्याकरिता कटिबध्द आहे.
या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेता श्री निलेश भाऊ खरबडे, भाजप महिला ज्येष्ठ नेत्या सौ. रेणुका दुधे, महिला आघाडी अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, नगरसेवक स्वच्छ्ता सभापती श्री येल्लया दासरफ, नगरसेविका – सौ. सुवर्णा भटारकर,सौ. सारिका कनकम शहर उपाध्यक्ष श्री राजू दासरवार, महिला आघाडी महामंत्री सौ. कांता ढोके,सचिव सौ.आरती अक्केवार, श्रीमती सरला लांडे,सौ.संध्या मिश्रा, भाजपा नेता- श्री अरुण भटारकर, श्री सतीश कनकम आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोना नियमांच्या अधीन राहून घेण्यात आला.