केंद्रातील मोदी सरकारच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त बल्लारपूर भाजपा च्या वतीने सफाई कर्मचारी यांचा सत्कार

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

केंद्र सरकार ला मोदीजी यांच्या अतुलनीय नेतृत्वात ७ वर्ष पूर्ण झाले असुन बल्लारपूर भाजपा च्या वतीने महाराष्ट्राचे लोकनेते विकासपुरुष माजी वित्त मंत्री मा.आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकलेखा समिती महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्या आवाहनावर भाजपा ज्येष्ठ नेता मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात मा.श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष न. प. बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर भाजपा अध्यक्ष श्री काशिनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत आज दि.३०/५/२०२१ रोज रविवार ला शहरात सफाई कर्मचारी ज्यांनी या महामारीच्या काळात आपलं अमूल्य योगदान व कर्तव्यनिष्ठ राहुन बल्लारपूर नगरीला स्वच्छ व सुंदर ठेऊन जी निरंतर सेवा दिली आहे करिता त्यांचे आभार प्रकट करण्याकरिता त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांना सुरक्षा रक्षा किट व धान्य किट वाटप करण्यात आले.खरतर त्यांच्या या सेवेला आपण कोणत्याही दृष्टीने आखु शकत नाही पण एकप्रकारे त्यांचा आभार व्यक्त करून त्यांच्या हितासाठी आम्ही सदैव सोबत असून प्रत्येक परिस्थितीत उभे राहु असा सूचक संदेश मा.नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा द्वारा या मोदी सरकारच्या ७ वर्षपूर्तीवर व्यक्त करण्यात आला. भाजपा हि सदैव जनसेवा व जनहितासाठी राजकारणात असुन देशाच्या आखरी व्यक्ती पर्यंत विकासाची धारा नेण्याकरिता कटिबध्द आहे.
या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेता श्री शिवचंद दिवेदी, भाजप महिला ज्येष्ठ नेत्या सौ.रेणुका दुधे, महिला आघाडी अध्यक्षा सौ.वैशाली जोशी, नगरसेविका – सौ.जयश्री मोहुरले, सौ. पुनम मोडक, नगरसेवक – स्वच्छ्ता सभापती श्री येलय्या दासरफ, श्री स्वामी रायबरम, शहर उपाध्यक्ष श्री राजू दासरवार, सचिव इंजि.देवेंद्र वाटकर , महिला आघाडी महामंत्री सौ.कांता ढोके,सचिव सौ.आरती अक्केवार, युवा नेता- श्री किशोर मोहूरले,श्री मिथलेश पांडे,श्री बबलु गुप्ता,श्री घनशयाम बुरडकर,श्री सरोज सिंह, श्री रोहित गुप्ता,श्री पियूष मेश्राम आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोना नियमांच्या अधीन राहून घेण्यात आला.