अखेर चामोर्शी येथील नॅशनल हायवे नाली लगतचे जुने विद्युत पोल काढून नवीन विद्युत पोल लावण्याचे काम जोमाने सुरू नॅशनल हायवे व विद्युत वितरण कंपनी यांच्यातील वाद संपुष्टात आमदार डॉ देवराव होळी यांचे पुढाकार

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे
दिनांक 28 मे 2021चामोर्शी
गडचिरोली जिल्ह्यतील चामोर्शी तालुक्यातील स्थानिक नगर पंचायत अंतर्गत चामोर्शी शहरातील मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूने नालीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे
व मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे
त्यातील महत्त्वाचे विकास काम म्हणजे दोन्ही बाजूने विद्युत वितरण कंपनीचे नवीन पोल जे बारा मीटरचे आहे टाकून जुने पोल जे फक्त नऊ मीटरचे होते काढणे हा होता, परंतु राष्ट्रीय महामार्ग व विद्युत वितरण कंपनी यांनी सादर केलेला इस्टीमेटचा
वाद निर्माण झाला व या वादात पावसाळा तोंडावर असताना काम रेंगाळला असता ? परंतु या विषयाची भनक आमदार डॉ देवराव होळी यांना लागली!  व  गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी काम तत्काळ पूर्ण झाले पाहिजे ही भूमिका घेतली, व विद्युत वितरण कंपनी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी
आणि सदर काम करणारी एजन्सी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचेकडे लावली चर्चेतून नवीन मार्ग निघाला व
वाद संपुष्टात आला आणि सबंधित एजन्सी यांनी विद्युत वितरण कंपनीचा करार झाला आणि चामोर्शी शहरात नवीन पोल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली
व सदर विकास काम युद्ध स्तरावर सतत सुरू आहे यासाठी नागरिकांच्या वतीने आमदार डॉ देवराव होळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर काम सुरू झाल्या बद्दल सदर नवीन पोल टाकण्याचे काम करणारे पवन भाऊ बडघरे आणि चमू यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार डॉ होळी यांचे अभिनंदन केले