गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण व किती मृत्यू सविस्तर वाचा

 

        प्रतिनिधी // आशिष दरडे
दि.29: आज जिल्हयात 97 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 4 नवीन मृत्यूमध्ये रा.खाकरी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, रा. कोंडाळा ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय पुरुष गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 97 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 06, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 08, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 29, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 08 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 09 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 34, अहेरी 19, आरमोरी 11, भामरागड 05, चामोर्शी 28, धानोरा 10, एटापल्ली 04, मुलचेरा 20, सिरोंचा 22, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.