वरोरा तालुक्यातील नागरी येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, बैल मालकाला आर्थीक सहकार्य दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून काल (दि.२८) ला वरोरा तालुक्यातील नागरी येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चंद्रशेखर सुर्यभान मुजबैले या शेतक-याला दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश वितरीत करण्यात आला.
श्री. चंद्रशेखर सुर्यभान मुजबैले या शेतक-याचा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. एक बैल गेल्याने शेतक-याला शेतीकामात अडचण निर्माण झाली होती. जिल्हा बैंकेच्या आर्थीक सहकार्याने शेतक-याला दुसरा बैल घेण्यास सहाय्य होणार आहे.
दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या सर्वच तालुक्यातील शाखेतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासल्या जात आहे.
याप्रसंगी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे, संचालक डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, पंचायत समिती वरोरा चे माजी सभापती दिलीपराव टिपले, नागरी ग्रा.प.चे सरपंच प्रकाश बावणे, कृऊबासमिती, वरोराचे संचालक किशोरराव भलमे, दत्ताभाऊ बोरेकर, नागरी से.स.सं.चे अध्यक्ष चंद्रशेखर मुजबैले, उपाध्यक्ष सुरेश लोंढ़े, सचिव एच.जे. लोखंडे, सदस्य विठ्ठलराव वरभे, श्यामसुंदर बलखंडे, प्रशांत नौकरकार, केळी से.स.सं.चे अध्यक्ष दिलीपराव महल्ले, नरेंद्रजी ठाकरे, गजानन पा. ठाकरे, मुरदगाव से.स.सं.चे सचिव एम.जी. गजबंधे, जिल्हा बँक नागरी चे निरीक्षक अजय झोटींग, व्यवस्थापक देवानंद पिसे, रोखपाल एस.आर. इखार, आदी उपस्थित होते.
यावेळी संपन्न कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवी शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले आहे.