आरोग्य विभागात कर्त्यव्य बजावताना मृत्यू झाल्यास सबंधित कर्मचारी यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावे आमदार डॉ देवराव होळी

       प्रतिनिधी // दीक्षा झाडे
दिनांक 28 मे 2021
चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथे कार्यरत अनेक वर्षांपासून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, सुपरिचित, सोनापूर वासीय जनतेच्या हाकेला प्रतिसाद देत आरोग्य सेवा देणाऱ्या, सर्वांना समजून घेऊन तण-मनाने काम करणाऱ्या कु. सुषमा दुर्गे(पाटिल) CNMसिस्टर सोनापूर, यांचे दिनांक 26 मे ला सोनापूर जवळ चामोर्शी मार्गावर जड वाहनाने अपघात झाला
अपघातात गंभीर जखमी झाल्याने, त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते, पण काल सायंकाळी 7:00 वा GMC नागपूर, येथे दुःखद निधन झाले। त्यांच्या अशा अचानक जान्याने, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले आपन गावाला दिलेली सेवा, योगदान, कायम स्मरणात राहील
त्यांच्या परिवारास, या दुःखातून सावरण्याचा धैर्य मिळो
परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हिच प्रार्थना
संपूर्ण गडचिरोली जिल्हा त्यांच्या दुःखात सहभागी आहोत अश्या शब्दात आमदार डॉ होळी यांनी प्रतिक्रिया दिली
व आरोग्य विभागातील कोणतेही कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावा तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचारी डॉ, नर्स , तथा रुग्णालयातील सफाई कर्मचारी यांचे आरोग्य विभागाच्या वतीने पन्नास लाख रुपयांचा विमा कवच देण्यात यावे अशी मागणी केली