
प्रतिनिधी//अंकुश पुरी
गडचिरोली : पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गडचिरोलीत पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली असून पेट्रोलचे दर १००. ६० रुपयांवर पोहचले आहे तर डिझेल चे दर ९०. १४ रुपयांवर पोहचले आहे. यामुळे पुन्हा खिशाला कात्री लागणार आहे. अशातच सुखाचा प्रवास खडतर होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहे. कोरोनामुळे सर्व व्यवसाय, धंदे ठप्प झाले आहेत. सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत. . आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता प्रवास करणे देखील न परवडणारा ठरत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने विविध राजकीय पक्षांकडून केंद्र शासनाचा निषेध केला जात आहे.
कोरोनामुळे अनेकांची रोजगार हिरावले आहे. त्यातच महागाईने भर पाडीत जनतेला दुहेरी संकटात ढकलले आहे. किराणा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक कामासाठी इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी पेट्रोल आवश्यक आहे. मात्र, एक लिटर पेट्रोलची किंमत चक्रावणारी ठरत असल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक नियोजन पूर्णतः विस्कळीत झाला आहे. यामुळे प्रवास करण्यासाठी सुद्धा सर्वसामान्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे.