शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

शिक्षक भारती संघटना जिल्हा चंद्रपूरची सहविचार सभा दि.२८ मे २०२१ रोज शुक्रवारला सायंकाळी ५ :०० वाजता आयोजित केली आहे.
मा. राजेंद्र झाडे, राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती चंद्रपूर यांचे अध्यक्षतेत *ZOOM APP* वर ही सहविचार सभा घेण्यात येणार आहे. या सहविचार सभेमध्ये पुढील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे .

१) कोरोनाकाळात मरण पावलेल्या शिक्षक आणि कुटूंबियांना श्रद्धांजली अर्पण करणे .
२) शिक्षकांच्या कोरोना काळातील विविध समस्यांवर चर्चा करणे .
३) शिक्षक भारती संघटना बांधनी संदर्भाने चर्चा करणे .
४) शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करणे .
५) आमदार कपिल पाटील साहेब यांचे कार्य सर्वदूर पोहचवणे.
६) मा.अध्यक्षांच्या परवाणगीने वेळेवर येणारे विषयांवर चर्चा करणे.

तरी या सहविचार सभेला सर्व शिक्षक भारतीच्या पदाधिका-यांनी उपस्थिती दर्शवावी.

सभेचे मार्गदर्शक : मा.भाऊराव पत्रे, विभागीय अध्यक्ष,शिक्षक भारती नागपूर विभाग
मा. संजय खेडीकर,राज्य संयुक्त कार्यवाह,शिक्षक भारती
मा. किशोर वरभे,राज्य संघटक सचिव, शिक्षक भारती
मा.सपन नेहरोत्रा,विभागीय कार्यवाह,शिक्षक भारती
मा.सुरेश डांगे,विभागीय सरचिटणीस,शिक्षक भारती
अशी माहिती श्री. पुरुशोत्तम टोंगे यांनी शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी तर्फे दिली आहे.