धान व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा आमदार डॉक्टर देवराव जी होळी चामोर्शी गडचिरोली व धानोरा येथे आमदारांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात बॅनर, फलक फडकावून तसेच घोषणा देवून कोरोना नियमांचे पालन करून गावागावात निषेध

धान व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा
आमदार डॉक्टर देवराव जी होळी
चामोर्शी गडचिरोली व धानोरा येथे आमदारांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
राज्य सरकारच्या विरोधात बॅनर, फलक फडकावून तसेच घोषणा देवून कोरोना नियमांचे पालन करून गावागावात निषेध

प्रतिनिधी // आशिष दरडे
दिनांक 26मे 2021 गडचिरोली
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी असून गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. जिल्ह्यातील धान व मका उत्पादक शेतकऱ्यां च्या शेतमालाची खरेदी शासनाने अजून पर्यंत केलेली नाही.३१ मे पर्यंत धान व मका खरेदीची मुदत असताना अजूनपर्यंत धान खरेदी झालेली नाही. तसेच मका खरेदीचे तर केंद्र देखिल सुरू करण्यात आले नाही ही शेतकरी बांधवासाठी अत्यंत अन्यायकारक बाब असून हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याचे प्रतिक्रिया आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी काल गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान केली. यावेळी जिल्ह्याचे महामंत्री गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर ,पंचायत समितीचे उपसभापती विलासजी दशमुखे, भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन जी गोहणे,महामंत्री हेमंतजी बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आंदोलनाला गर्दी न करता शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात आले
चामोर्शी येथील आंदोलनात चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिषजी पिपरे , युवा मोर्चा नेते प्रतीक राठी भाजपाचे जेष्ठ नेते जयरामजी चलाख, तालुका युवा मोर्चा यांनी सहभाग घेतला तर धानोरा येथे जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे नेते साईनाथजी साळवे,अंतू भाऊ साळवे नगरसेवक सुभाषजी धाईत, गजानन भाऊ साळवे, विजयजी कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते
आंदोलनादरम्यानम हाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बॅनर व फलक दाखवून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात या करिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मा.जिल्हाधिकारी गडचिरोली ,चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी, गडचिरोली, धानोरा येथील मा. तहसीलदार याना दिले. मा. जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याची विनंती चर्चेदरम्यान केली
प्रशासनाकडून योग्य उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा आमदार डॉ देवराव होळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख युवा नेते प्रतीक राठी यांनी चामोर्शी
तालुक्यातील सोनापूर , अड्याल
दुर्गापूर , रविंद्रपुर , राममोहनपूर
सुभाषग्राम , बहादुरपुर येथे जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनास धान मक्का उत्पादक शेतकरी यांनी प्रचंड पाठिंबा दर्शवला सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्यास शेतकरी बांधवांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे