ऑटो रिक्षा चालकांना सरकारी मदत द्यावी-मा.अरुण बहादे

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

राज्य कोरोना- 19 च्या प्रकोपाने लाकडाऊन चा काळ सामान्य लोकांसमोर जिवन मरण्यासाठी संघर्ष करित आहेत. तर असंघठित मजुर, कामगार यांना दैनंदिन जिवनातील सामान्य गरजाही पुर्ण करता येत नाही.
त्यातच ऑटो चालकांना तर सार नकोसे झाले आहे. पेट्रोल शंभरावर, दैनंदिन वस्तुचे भाव आकाशाला टेकले आहेत त्यामुळे ऑटो चालकांची तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती आहे.

करिता सरकारने ऑटो चालकांना दरमहा प्रत्येकी आठ हजार रुपये प्रती महिना दिला पाहिजे. तसे निवेदन राज्य सरकारला देण्यात येत असल्याचे मा.अरुण बहादे,अध्यक्ष, मूलनिवासी ऑटोरिक्षा चालक मालक संघ यांनी प्रेस वार्ता मध्ये सांगितले. तसेच पालक मंत्र्यांना देखील शिष्ठमंडळ भेटणार असल्याचे मा.बहादे यांनी सांगितले. मुलनिवासी आॅटो चालक मालक संघाच्या राज्यव्यापी मागणीला मान. जी. के. उपरे, राज्य पीपल्स पार्टी आॅफ इंडिया(डेमाॅक्रेटिक), मान.महेन्द्र सोरते, मुल निवासी संघ जिल्हा संघटन सचिव, चंद्रपुर ने सक्रीय पाठिंबा दिला आहे. अशी माहिती अरूण बहादे, मूलनिवासी ऑटोरिक्षा चालक मालक संघ,बल्लारपूर यांनी दिली आहे.