गडचिरोली जिल्ह्यात 134 कोरोनामुक्त, 5 मृत्यूसह 83 नवीन कोरोना बाधित

 

प्रतिनिधी // आशिष दरडे
दि.26 गडचिरोली: आज जिल्हयात 83 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 134 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 5 नवीन मृत्यूमध्ये हेटी ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, चामोर्शी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, येरंडी ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, मोहझरी ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 83 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी 6, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 5, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 134 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 50, अहेरी 3, आरमोरी 13, भामरागड 00, चामोर्शी 26, धानोरा 1, एटापल्ली 4, मुलचेरा 18, सिरोंचा 3, कोरची 5, कुरखेडा 7 तसेच वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.