शासकिय नौकरी व अनुदान देण्यात यावे- श्री. हर्षल शिंदे

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

दिनांक : 19 मे 2021 रोजी रजनी भालेराव चिकराम, वय 35 रा. घोट ही महिला वाघाच्या हल्ल्यात मरण पावली. तिच्या पश्यात 2 अपत्य असुन, तिचा पति दिव्यांग आहे. घरची सर्व जबाबदारी ही रजनी हिच्यावर होती. वाघाच्या हल्ल्यामधे ती मरण पावल्यामुळे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
तरी शासनाने तिच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकिय सेवेत सामावुन घ्यावे तसेच कुटुंब निर्वहासाठी आर्थिक मदत करावी. असे निवेदन श्री. हर्षल शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख, चंद्रपुर यांनी मान. वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांना दिनांक:24/05/2021 ला दिले आहे.