गडचिरोली जिल्हयातील हृदयद्रावक घटना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पोटातील बाळासह दगावली आई

 

प्रतिनिधी //अंकुश पुरी

गडचिरोली : सुखाचा प्रवास करण्यासाठी रस्ता हा मोलाची भूमिका बजावत असतो मात्र खराब वाटेने अनेक दुर्घटना घडत असतात अशीच एक घटना जिल्हयातील खराब रस्त्यामुळे पोटातील बाळासह आई दगावल्याची हृदयद्रावक घटना १९ मे २०२१ रोजी घडली. प्रतिभा दुधराम चौधरी (२७) रा.चिंगली ता. धानोरा. जि.गडचिरोली असे महिलेचे नाव आहे.
सदर महिला गरोदर होती तिला १४ मे रोजी प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या त्यामुळे तिला प्रसुतीकरिता गडचिरोली येथील महिला बाल रूग्णालयात दाखल करण्यात येत होते. दरम्यान चिंगली येथून रांगी -चातगाव मार्गे गडचिरोली येथील रूग्णालयात दाखल करतांना रांगी-चातगाव मार्गाची दुरावस्था असल्यामुळे प्रवास खडतर झाला. खराब रस्त्यामुळे सदर गरोदर महिलेला रस्त्यातच रक्तस्त्राव सुरू झाला. गडचिरोली येथील महिला बाल रूग्णालयात सदर महिलेला दाखल करण्यात आले तेव्हा पोटातच बाळ गुदमरल्यामुळे दगावल्याचे निष्पन्न झाले. पोटातच बाळ दगावल्याने सदर महिलेला पुढील उपचाराकरिता १५ मे रोजी रात्रो १० वाजताच्या सुमारास नागपूर येथे रेफर करण्यात आले. ४ दिवस नागपूर येथील रूग्णालयात महिलेवर उपचार सुरू होता मात्र १९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खराब रस्त्यांमुळे अनेक घटन घडल्याचे सामोर येत आहे. कधी अपघात तर कधी खराब रस्त्यामुळे रूग्णावर वेळेवर उपचार न झाल्याने रूग्ण दगावल्याचे घटना घडतांना दिसत आहे. रस्ता हा प्रवास करण्याचा एकमेव साधन आहे. देशभरात सध्या अनेक भागात रस्त्याचे कामे सुरू आहे. मात्र रस्ता बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने वर्षभरातच रस्त्याची उधळपट्टी होतांना दिसते. खराब रस्त्यांमुळे रूग्ण दगावल्याची घटना हृदयद्रावक आहे. देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. रूग्णालयात बेड मिळणे कठिण झाले आहे. वेळेवर उपचार न भेटल्याने रूग्ण दगावत आहेत मात्र निष्काळजीपणाने काम करून रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदारामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातांना सुध्दा दिसत आहे.
अनेक वेळा रस्ता खराब असून दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी सुध्दा वेळोवळी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तसेच बांधकाम विभागाकडे केली होती. काही बातम्याही प्रसारमाध्यमांवर झळकल्या होत्या मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह संबधित विभागाने दुर्लक्ष केले आणि पोटातील बाळासह महिलेचा जिव गेला यास जबादार कोण असा सवाल सुध्दा उपस्थित होत आहे. रस्ता बांधकामाकरिता दरवर्षी मोठा निधी शासनाकडून मिळत असतो पण कामचुकारपणा व भ्रष्टाचाराची लागलेली किड यामुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. आरोग्य सुविधा व्यवस्थीत असूनही रस्ता खराब असल्याने जिव जाणे म्हणजे मोठी लाजीरवाणी बाब आहे. रस्त्यामुळे वेळेवर उपचार न मिळता रूग्ण दगावणे ही प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे उडवणारी घटना आहे. अशा घटना पुन्हा घडू नये याकडे प्रशानाने विशेष लक्ष घालुन प्रयत्न केले पाहिजे.