काटवल(तु) ग्रामपंचायतला औषधी व सैनिटाइजरचा पुरवठा भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार, भद्रावती यांचा उपक्रम कोरोणा काळातील जनसेवेत सातत्य

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती व शिंदे परिवार, भद्रावती यांचे संयुक्त विद्यमाने भद्रावती व वरोरा तालुक्यात कोविड-१९ ऊपाययोजना व कोरोनाबाधितांकरीता निशुल्क सेवाकार्य सातत्याने सुरु आहे. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, चंद्रपुरचे माजी अध्यक्ष व संचालक रवि शिंदे व शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विवेक शिंदे यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुस-या लाटेत कोरोनाबाधित रूग्ण, नातेवाईक व जनतेकरीता दिलासादायक कार्य सुरु आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही मास्क, सॅनिटायजर, पीपीई किट, औषधींचे वितरण सातत्याने सुरु आहे. वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना कोरोना काळात लागणारी आवश्यक साहित्य पुरविणे सुरु आहे.
याच जनसेवेच्या प्रवासातील एक टप्पा म्हणून आज (दि.21) रोज शुक्रवारला तालुक्यातील काटवल(तु) ग्रामपंचायतला औषधी व सैनिटाइजरचा पुरवठा करण्यात आला. कोरोना काळात ग्रामीण जनतेला दिलासा मिळावा व त्यांना मदत व्हावी याउद्देशानेच शिंदे परिवाराने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मग ते निशुल्क कोविड सेंटर सुरु करणे असो, निशुल्क आरोग्य सेवा पुरवणे असो, किंवा प्राणवायू पुरवठा करणा-या यंत्राची उपलब्धता करून देणे असो
यासाठी भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल.