समाजाने पोलिसांचे ऋण लक्षात ठेवावे :- देवराव भोंगळे लोकनेते आम.मुनगंटीवार यांचे तर्फे घुग्गुस येथे आरोग्य सुरक्षा किट चे वितरण

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

प्रसंग कोणताही असो जनसेवेसाठी पोलीस सदैव तत्पर असतात. कोरोना च्या संकटात घरी राहण्याच्या सूचना असल्यातरी पोलीस, डॉक्टर्स व पत्रकार यांना हे शक्य नाही. त्यातच पोलीस कोविड १९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आपण पोलिसांमुळे सुरक्षित आहो, हे समजून घेतले पाहिजे. समाजाने पोलिसांचे हे ऋण लक्षात ठेवावे, असे विनंतीवजा आवाहन भाजपा नेते,माजी जी.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.*
ते भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपुर च्या वतीने घुग्गुस पोलीस स्टेशन येथे आयोजित आरोग्य सुरक्षा किट वितरण उपक्रमा प्रसंगी शनिवार (15मे) ला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे, जि.प सभापती नितु चौधरी, भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, सरपंच संतोष नुने, पं. स. उपसभापती निरिक्षण तांड्रॉ, पोलिस निरिक्षक राहुल गांगुर्डे, डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे , प्रशांत विघ्नेश्वर, घुग्गुस ग्रापं चे सदस्य साजन गोहने, संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार, सुचिता लुटे, पुजा दुर्गम, भाजपा नेते बबलु सातपुते, प्रविण सोदारी, पुंडलीक उरकुडे, दिलीप कांबळे, प्रकाश बोबडे, चौधरी, श्रीकांत सावे उपस्थिती होती.

भोंगळे म्हणाले, जनता कर्फ्यु पासूनच लोकनेते आम.सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना महामारीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, जनतेलाच नाही तर,शासन प्रशासनाला मदतीचा हात दिला. घरातून लढणारी जनता असो की बाहेर लढा देणारे पोलीस, डॉक्टर्स , चिंतीत झालेला श्रमिक असो की हतबल झालेले दिव्यांग व विद्यार्थी सर्वांसाठी,आम. मुनगंटीवार यांनी सूक्ष्म नियोजन करून मदत दिली. रक्तदान, पीपीइ किट, निःशुल्क रुग्णवाहिका, मास्क वाटप, धान्य वाटप, आदि उपक्रम सुरू असताना आता पोलिसांना आरोग्य सुरक्षा किट ,त्यांची तपासणी करून दिली जात आहे. भेदभाव न करता हा मदतीचा ओघ सुरू असून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकात डॉ. गुलवाडे यांनी आरोग्य सुरक्षा किट वितरणाची भूमिका विशद केली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ वाकदकर यांचे सह आरोग्य रक्षकांना आरोग्य सुरक्षा किट मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार विवेक बोढे यांनी केले. यशस्वितेसाठी रामकुमार आकापेलिवार, विकास गोठे, सैय्यद शफी, आरोग्य सेवक झेड. बी.जुनारकर, एन सी शेडमाके, आय के दुपारे, के आर रंगारी यांनी अथक परिश्रम घेतले.*