देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा- खासदार बाळू धानोरकर

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) आयोजित कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कस्तुरबा चौकात मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, ओबीसी विभाग शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव उमाकांत धांडे, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक बापू अंसारी, एनएसयुआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय सचिव मोहन डोंगरे, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, केतन दुरसेल्वार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कासिफ अली, धरमु तिवारी, मिनल शर्मा, आकाश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.