गडचिरोली जिल्ह्यात 363 कोरोनामुक्त सविस्तर वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण

 

8 मृत्यूसह 180 नवीन कोरोना बाधित

 

दि.20*: आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 363 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 8 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष चपलवाडा ता. चामोर्शी, 32 वर्षीय पुरुष कान्हाळगांव ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर, 55 वर्षीय पुरुष दिघोरीमोठी ता. लाखांदूर जि. भंडारा, 53 वर्षीय पुरुष डोगरगांव ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर, 25 वर्षीय पुरुष अहेरी, 85 वर्षीय महिला सर्वोदय वार्ड, गडचिरोली, 70 वर्षीय महिला राजंनगट्टा ता. चामोर्शी, 57 वर्षीय पुरुष गोकुल नगर गडचिरोली,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 38, अहेरी तालुक्यातील 19, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 03, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 22 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 15 जणांचा समावेश आहे. तर आज *कोरोनामुक्त झालेल्या 363 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 90,* अहेरी 48, आरमोरी 40, भामरागड 07, चामोर्शी 51, धानोरा 11, एटापल्ली 14, मुलचेरा 34, सिरोंचा 26, कोरची 03, कुरखेडा 18 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.