आमदार डॉ, देवराव होळी यांचे वैनगंंगा नदीत बुडून मरण पावलेल्या मुलींच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट व आर्थिक मदत

          प्रतिनिधी // दीक्षा झाडे
भेंडाळा – 19 मे 2021
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा जवळील वाघोली नदी घाटावर पैल तीरावरील झाडाचे आंबे तोडण्यासाठी डोंग्याने नदी पार
करून जाणे तीन अल्पवयीन मुलींच्या जीवावर बेतले वैनगंगा नदीत त्यांच्या डोंगा ( छोटी नाव )
उलटुन तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण वाघोली गावावर शोककळा
*पसरली आहे मृतकात येथील सोनी मुकरु शेंडे 13 वर्ष , समृध्दी
धीवरू शेंडे 11 वर्ष या दोन चुलत बहिणीसह त्यांची आते बहीण पल्लवी रमेश भोयर 15 वर्ष रा, येवली ) यांचा समावेश आहे वाघोली येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन मदत देऊन आर्थिक मदत केले
व यावेळी उपस्थित तलाठी
सोमनकर , पोलीस पाटील व गावकरी यांच्या समोर आमदार डॉ देवराव होळी यांनी राज्य सरकारला या तीनही मृतक मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा आर्थिक मदत करण्याची मागणी केली* *यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजपा युवा मोर्चा नेते प्रतीक राठी ,भाजप पदाधिकारी नाजूक पोरटे ,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते