चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि.19 मे ते 21मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 19 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1:30 वाजता राजू फुलझेले ब्रह्मपुरी यांच्याकडे सदिच्छा भेट. दुपारी 2:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोविड संदर्भात आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3:30 ते 5:00 वाजता तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी येथे व्ही.सीद्वारे मंत्रिमंडळ बैठक. सायंकाळी 5:00 वाजता तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी येथून आरमोरी जि.गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

गुरुवार दि. 20 मे 2021 रोजी सकाळी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास,गडचिरोली येथून जाम बु. ता. सावली जि. चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 12:30 वाजता जाम बु. ता. सावली येथे आगमन व श्री.थोरात, श्री बावनवाडे यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 1:00 वाजता पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, व्याहाड खुर्द येथे तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोविड संदर्भात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 4:30 वाजता व्याहाड खुर्द वरून गडचिरोली कडे प्रयाण करतील. सायंकाळी 5:00 वाजता शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास गडचिरोली येथे आगमन व मुक्काम राहतील.

शुक्रवार दि. 21 मे 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास,गडचिरोली येथून सिंदेवाही, जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोविड संदर्भात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 4:00 वाजता सिंदेवाही वरून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम.