मास्क व सॅनिटायझर वाटप करून सरपंचाने वाढदिवस केला साजरा

 

प्रतिनिधी/अंकुश पुरी

देसाईगंज : सध्या संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे तरी देखील समाजाचे आपण काहीतरी देने आहे या भावनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्च टाळून वाढदिवसाच्या निमित्ताने चोप येथील सरपंच नितीन लाडे यांनी केले गावामधील गरोदर महिला व स्तनदा माता यांना मास्क व सॅनेटायझर, प्रोटीन डब्बा व फळ वाटप केले.
संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. योग्य खबरदारी घेतल्यास कोरोना संसर्ग आपण रोखू शकतो त्याच अनुषंगाने सामाजीक बांधिलकी जपत चोप चे सरपंच नितीन लाडे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून गावातील अंगणवाडी मध्ये गरोदर महिला व स्तनदा माता यांना मास्क व सॅनेटायझरझर प्रोटीन डब्बा, फळांचा वाटप केले. यावेळी राधेश्याम बरय्या, राष्ट्रवादी जिल्हा संघटक, उपसरपंच प्रकाश डोंगरवार, धनंजय पर्वते, थोरात मॅडम, रामटेके मॅडम अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.