गडचिरोली जिल्ह्यात 550 कोरोनामुक्त 12 मृत्यूसह 276 नवीन कोरोना बाधित

 

प्रतिनिधी // आशिष दरडे

आज जिल्हयात 276 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 550 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 75 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 56 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय महिला, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 276 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 75, अहेरी तालुक्यातील 29, आरमोरी 07, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 13, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 31 जणांचा समावेश आहे. तर आज  कोरोनामुक्त झालेल्या 550 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 191, अहेरी 42, आरमोरी 63, भामरागड 11, चामोर्शी 46, धानोरा 15, एटापल्ली 24, मुलचेरा 17, सिरोंचा 21, कोरची 24, कुरखेडा 35 तसेच वडसा येथील 61 जणांचा समावेश आहे.